ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा अनोखा निर्णय!

0

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी महाविकास आघाडी सरकारचा अनोखा निर्णय!

महाविकास आघाडी सरकार ने महाराष्ट्रातील ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी वस्तीगृहाच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत संत भगवानबाबा वसतिगृह योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील ४१ तालुक्यांमध्ये ऊसतोड कामगारांच्या पाल्यांसाठी ८२ वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

संत भगवानबाबा वसतिगृह योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात बीड जिल्ह्यातील परळी, केज, बीड, गेवराई, पाटोदा व माजलगाव, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड व पाथर्डी तसेच जालना जिल्ह्यातील घनसावंगी व अंबड या दहा तालुक्यात मुला-मुलींसाठी 100 क्षमतेचे प्रत्येकी एक याप्रमाणे 20 वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील वसतिगृहांचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत भाड्याच्या इमारतींमध्ये हे वसतिगृह याच शैक्षणिक वर्षात सुरू करण्यात येतील.आज स्व.मुंडे साहेबांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून हा निर्णय घेत स्व.मुंडे साहेबांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.

ऊसतोडणी कामगारांच्या मुलांच्या भविष्याच्या दृष्टीने महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय महत्वपूर्ण आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.