
काँग्रेसच्या वतीने पेट्रोल पंपावर गाजर, लॉलीपॉप देऊन अनोखे आंदोलन…
देशातील महागाईने कळस गाठला आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, आणि खाद्यतेल यांच्या भरमसाठ किंमती वाढल्या आहेत. कोरोना च्या अशा काळात नागरिक एकीकडे आरोग्य आणि दुसरीकडे महागाई याने त्रस्त झाले आहेत. महागाईने सर्वसामान्य माणसाचे जनजीवन विस्कळित झाले आहे.
उल्हा नगर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल पंपावर गाजर आणि लॉलीपॉप नागरिकांना देऊन महागाई विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. २०१३ मध्ये ४३० रुपयात मिळणारे गॅस सिलेंडर आता ८५० रुपयात खरेदी करावा लागत आहे. अच्छे दिनाच्या नावाखाली आज लोकांना वाईट दिवस आले आहेत हे निश्चित आहे.
पेट्रोल ने शंभरी पार केली आहे तर डिझेल ची दरवाढ पण मोठ्या प्रमाणात झाली आहे. या निमित्त देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांना पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिकात्मक व्यक्तीस विजयी कप देऊन उल्हासनगर काँग्रेस तर्फे सत्कार करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना मोदी सरकारने दिलेल्या आश्वासनाचे उपहासात्मक प्रतीक म्हणून लॉलीपॉप आणि गाजर आंदोलकाना देऊन मोदी सरकार विरोधात घोषणा देऊन आंदोलन केलं आहे.