
आदित्य ठाकरेंच्या हिरव्यागार लॉबीची जयंत पाटलांना भुरळ!
महाराष्ट्राच्या पर्यावरण मंत्र्याच्या केबिन शेजारच्या शेजारच्या लॉबीवर जलसंपदा मंत्री जयंत पाटलांचे विशेष प्रेम असल्याचे उघड झाले आहे. पर्यावरण आणि जलसंपदा जवळचे, मिळते जुळते खाते असल्यामुळे तर हा स्नेह नाही ना असे विचार मनात येऊन जातात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या बहुतांश बैठका युवा सेना प्रमुख, पर्यटन मंत्री तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयातील केबिनशेजारच्या लॉबीवर होत आहेत.
लॉबीने जयंत पाटलांच्या मनात विशेष घर केले आहे. त्यामागील कारण सुद्धा तितकेच सुंदर आहे त्या ठिकाणी असणारी झाडे पक्षांचा किलबिलाट आणि मुंबईचे दिसणारे देखणे रूप कोणालाही आकर्षित करते. ठाकरे मंत्रालयात नसल्याने जयंत पाटील बहुतांश बैठका याच ठिकाणी घेतात. विशेष म्हणजे राज्यामध्ये महामंडळाच्या निवडणुकांचा विषय पुढे आल्यापासून जयंत पाटलांच्या केबिनमध्ये वाढणारी रेलचेल मोठी होत आहे. या लॉबीवर जयंत पाटलांनी विषेश प्रेम दाखवत बैठक घेतली!