एकेकाळी स्कुटरवर सामान विकायचे दोघे मित्र, आता १ लाख करोड रूपयांना विकली गेली त्यांची कंपनी

0

अलिबाबा डॉट कॉम, अॅमेझाॅन डॉट काॅम या दोन ई काॅमर्स कंपन्या अनुक्रमे चीन व अमेरिकेत उदयाला आल्या आणि संपूर्ण जगभर पसरल्या. या कंपन्या कोणतही प्रॉडक्शन करत नाहीत तर ग्राहकाच्या पसंतीचा सगळा माल ई आॅर्डरवर घरपोहोच खरतात. बिझनेसची एक छोटीशी संकल्पना केवढा मोठा पसारा निर्माण करू शकते याच उदाहरण अॅमेझॉनवरून सहजच येते. बिझनेससाठी भांडवल, सेटअप नंतर लागत तर सुरुवात एका डिफरंट आयडीयाने होते. हिच क्लुप्ती वापरत भारतातील दोघा तरुणांनी फ्लिपकार्टची पायाभरणी केली. मित्रांनो चला बघूया या दोन तरुणांची संकल्पना यशस्वी कशी झाली.

सचिन बन्सल आणि बिनी बन्सल हे दोन मित्र चंदिगढचे रहिवासी असून दोघांनी सेंट अॅनी कान्व्हेंट स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतल. मध्यमवर्गीय कुटुंबातील दोघांनीही शालेय शिक्षणात चमकदार कामगिरी केली व दोघांनी इंडियन इनास्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (I I T) दिल्ली येथून इंजिनियरींग पूर्ण केल. मध्यमवर्गीय संकेताप्रमाणे दोघांनी काही दिवस नोकरी केली, त्यात अॉमेझॉन डाॅट काॅमवरही काम केल.

सचिन आणि बिन्नी यांच्या तरुण मनात बिझनेस सुरू करायचा ही संकल्पना जोर धरू लागली. त्यातून दोघांची धडपड सुरू झाली. दोघांनी २००७ साली केवळ १०००० भांडवल, भाड्याचा १ फ्लॅट आणि दोन संगणक अशी गुंतवणूक करत ‘फ्लिपकार्ट आॅनलाईन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने ई कॉमर्स कंपनी बंगळुरात सुरू केली. यावर ते फक्त पुस्तक विकत असत. परंतु कंपनी सुरू केल्यानंतर पहिले १० दिवस एकही आॅर्डर नव्हती पण आंध्र प्रदेशातील एका ग्राहकाने लिव्हींग मायक्रोसॉफ्ट टू चेंज द वल्ड हे जॉन वूड यांचे पुस्तक मागवले. यानंतर “फ्लिपकार्ट की नय्या चल पडी”. फ्लिपकार्टने पुस्तकांबरोबर इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, दागिने, कपडे, गृह उपकरणे, खेळणी, वॉचेस, वॉलेट विकायला सुरुवात केली.

फ्लिपकार्टचा भारततीय मार्केटमधील वाढलेला प्रसार पाहता अल्पावधितच ती भारतातील सर्वांत मोठी ई कॉमर्स कंपनी झाली. काही वर्षांपूर्वी अमेरिकन कंपनी वाॅलमार्टने तिला विकत घेत ७५ टक्के भागिदारी स्वताकडे हस्तांतरित केली. यासाठी वॉलमार्टने १५०० दशलक्ष रुपये म्हणजेच १ लाख करोड रुपये सचिन आणि बीन्नी बन्सलला आॅफर केले. सध्या फ्लिपकार्टची अनेक कार्यालय बंगळुरूसह देशातील महत्वाच्या शहरात आहेत. सचिन आणि बिनी बन्सल दोघांची आडनाव एक पण दोघे भाऊ नाहीत, जिवलग मित्र आहेत. समान ध्येय असलेल्या ध्येयवेड्या या दोघांनी भागिदारी करत जिद्दीने स्वताची स्वप्न पूर्ण केली. केवळ १०००० भांडवली गुंतवणुकीपासून सुरुवात केलेल्या फ्लिपकार्टचे आजचे बाजारमूल्य २००० मिलियन अमेरिकन डॉलर किंवा १.३२ लाख कोटी रुपये आहे.

फ्लिपकार्ट साईटवर सातत्याने वस्तूंवर डिस्काउंट देण्यात येतात. सणावारांना आॅफर ठेवल्या जातात. कॅश आॅन डिलेव्हरी हा प्रमुख फंडा असला तरी कंपनीकडून क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकींग, वाऊचर स्कीमही उपलब्ध आहेत. यासर्वांमुळे लोक मनसोक्त शॉपिंगचा आनंद घरबसल्या घेतात. व्हरायटी आॅफ प्रॉडक्ट, गुड इमेजेस, कम्पॅरिटीव्ह प्राईज, गॅरंटी या सर्व वैशिष्ट्यांमुळे कस्टमर या साईटकडे आकृष्ट होतात.
मित्रांनो हि माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. जगभरातील रंजक माहिती मिळवण्यासाठी आमचे फेसबुक पेज लाईक करा.लेख जरुर शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.