म्युकरमायकोसिस आजाराच्या बाबतीत खा.अमोल कोल्हेंची सरकारकडे ही मागणी…

0

कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या बरोबर सर्वांच्या समोर म्युकरमायकोसिस नावाचा दुसरा आजार समोर उभा राहिला आहे. सध्या म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण वाढत आहेत. या वरती उपचार केले जात आहेत ते फारच महागडे आहेत. सर्वसामान्य माणसाला हे उपचार घेणे परवडत नाही. याच दृष्टिकोनातून खा. अमोल कोल्हे यांनी सरकारकडे मागणी केली आहे.

म्युकरमायकोसिस या आजारावरील उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या अॅम्फोटेरोसीन बी इंजेक्शन्स ही फारच महागडी औषधे आहेत. याची किंमत ही सर्वसामान्य माणसाच्या आवाक्यात आणण्याच्या दृष्टिकोनातून खा. अमोल कोल्हे यांनी पावले उचलली आहेत. डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय खते व रसायन खात्याचे मंत्री सदानंद गौडा, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि केंद्रीय औषध प्रबंध महानिदेशक यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

“या आजारावर उपचार करण्यासाठी अॅम्फोटेरोसीन बी हे इंजेक्शन्स वापरले जाते. या इंजेक्शन ची बाजारातील किंमत रु.७९०० इतकी असून साधारणतः ७५०० रुपयाला मिळत आहे. एका रुग्णाला किमान १० इंजेक्शन्सची गरज भासते. त्यामुळे रुग्णाला येणारा खर्च हा फारच मोठा आहे. त्यामुळे या इंजेक्शन चे भाव हे नियंत्रणात अनावेत अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे. ही महत्त्वपूर्ण बाब शासनाच्या लक्षात आणून देण्याचे काम खा. डॉ.अमोल कोल्हे यांनी केलं आहे”.

Leave A Reply

Your email address will not be published.