
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले!
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले होते. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी मुंबई मधील कार्यालयातील कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यकर्त्यांना संबोधित केले.
बोलत असताना शरद पवार साहेब म्हणाले की आपण २२ वर्षांपूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आणि संघर्षाची भूमिका स्वीकारली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने या २२ वर्षांचा आढावा आपण घेतोय. असे शरद पवार साहेब बोलत असताना म्हणाले.
शरद पवार म्हणाले की “कोरोना संकटात देशाचं एकंदरित चित्र पाहिलं तर अधिक गंभीर स्थिती महाराष्ट्रात होती. तिचा सामना करण्यासाठी व लोकांना दिलासा, विश्वास देण्यासाठी आरोग्य खात्याने राजेश टोपेंच्या नेतृत्वात जे काम केले त्यातून आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकतो, हा विश्वास सामान्य लोकांमध्ये तयार झाला”. यापुढे महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळण्याची कुवत असलेली एक पिढी आज राष्ट्रवादीमधून तयार होत आहे आणि त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम आपण केले पाहिजे. या नेतृत्वाच्या फळीमागे सामान्य माणूस विश्वासाने उभा राहून त्यांची बांधिलकी कायम टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत.