घटना शिल्पकार,महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती

0

दलित उध्दारक आणि संपूर्ण देशाला आदरणीय असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब रामजी आंबेडकर यांची आज जयंती आहे.दिनदुबळ्यांचे कैवारी असलेले आंबेडकर लहानपणापासूनच बंडखोर आणि हुशार होते.घडणार्या प्रत्येक घटनेचा विचार वैचारिक पातळीवर करून त्यातील सत्यता तपासण्याची कसोटी बाबासाहेब नेहमी जोपासत राहिले.

बाबासाहेबांच आयुष्य एक प्रेरणादाई प्रवास आहे.उपेक्षित ठेवल्या गेलेल्या समाजाला त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याच काम केल.स्वच्छतेच्या सवयी,शिक्षण,संघटन ते व्यसनांना विरोध असा चौबाजूंनी या वर्गाचा व्यक्तिमत्व विकास केला.सातत्यान अस्पृश्य ही चुकीची प्रथा बंद पाडण्याचा प्रयत्न करत राहिले.

अत्यंत विनयशील असलेले बाबासाहेब 18 तास अभ्यास करत असत या कष्टातून त्यांनी वकीलीच शिक्षण पूर्ण केल.त्यांचे बांधव म्हणजेच भीमबांधव यांच्यासाठी झटताना त्यांनी देशाची प्रगती तसच समाजातील तळागाळाचा विचार केला.महाडच्या तळ्यातील पाणी स्पर्श करण असो की,मंदिर प्रवेश बाबासाहेब आपल्या बांधवांना समानतेचा न्याय देण्यासाठी तळमळीने लढले.त्याचीच फळ आज भीमबांधव चाखत आहेत.

देशाची घटना म्हणजेच देशाचा आरसा असतो.बाबासाहेबांनी हे काम लिलया पेलत देशाच्या प्रत्येक संस्कृतीचा अभ्यास करत सर्वांना समान न्याय मिळेल याची काळजी घेतली.विशेषता वर्षानुवर्ष पिचलेल्या समाजाला जातिबंधन,गरिबी यातून सोडवण्याचा प्रयत्न केला.आरक्षणची तरतूद करून आपल्या दलित,दुखित बांधवाना शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या.

बाबासाहेबांची दूरदृष्टी त्यांच्या या समाजाला सुशिक्षित,आर्थीक सबल तसेच सुसंस्कृत पाहत होती.बाबासाहेबांच्या नितांत धोरणी विचारांमुळ भीमबांधव आज शिक्षणात,नोकरीत चमकत आहेत.बाबासाहेबांनी बौध्द दिक्षा घेत दलित समाजाला जगण्याचा मार्ग दिला.बाबासाहेबांनी आपल्या समाजाला सर्वच जोखडातून मुक्त करण्याचा प्रयत्न केला.

भीमबांधवांच्या बाबासाहेबांबद्दलच्या भावना आदरणीय आणि उध्दारक अशा असून त्यांनी आखून दिलेल्या मार्गावर चालण हेच त्यांच कर्तव्य अस ते मानतात.आजच्या जयंतीनिमित्त या महामानवला मानवतेकडून आभिवादन

Leave A Reply

Your email address will not be published.