विधानपरिषद आमदारांच्या नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे ? जयंत पाटील

0

महाराष्ट्रामध्ये १२ विधान परिषद सदस्यांच्या नियुक्ती बाबतीत राज्यपाल कित्येक दिवसांपासून निर्णय घेत नाहीत. सातत्याने राज्य सरकारने पाठपुरावा करून सुद्धा नियुक्त्यांचा बाबतीत निर्णय घेतला गेला नाही राज्य सरकारने राज्यपालांना दिलेली यादी दहाड झाल्याचे गहाळ झाल्याची माहिती माहिती माहितीच्या अधिकारात मध्ये समोर आली होती.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शेलक्या शब्दांत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. जयंत पाटील म्हणाले “विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत वेळोवेळी राज्य सरकारने मा. राज्यपालांना आठवण करून दिली आहे. नियुक्तीला विलंब लावणं हे ज्येष्ठ व आदर्श राज्यपालांना कितपत मान्य आहे, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांनी केलाय”.

तसेच जयंत पाटील पुढे म्हणाले की “राज्य सरकारने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पाठवल्या आहेत. सरकारने शिफारस केल्यानंतर इतक्या काळानंतरही नियुक्त्यांबाबत निर्णय झालेला नाही. राज्यपालांनी निर्णय न घेतल्यामुळे राज्य सरकारच्या शिफारशी करण्याच्या अधिकारावर गदा येतेय का? हा खरा प्रश्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले”.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.