आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी या आयात नेत्यांना पवार साहेबांवर टिका करावी लागते’!

0

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती टीका केली आहे. त्या म्हणाल्या की ‘आताची राष्ट्रवादी काँग्रेस ही शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही.’ अशी टीका त्यांनी अकलूज आणि नातेपुते ग्रामपंचायतीचे नगरपरिषदमध्ये रूपांतर करण्यासाठी ग्रामस्थांचे साखळी उपोषण सुरू आहे. त्या निमित्त बोलत अस्त्ना त्यांनी टीका केली.

या वरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी ट्विट करत अप्रत्यक्षपणे भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या वरती टीका केली आहे. ट्विट मध्ये त्या म्हणाल्या की “उभ्या महाराष्ट्राला माहित आहे ताईंनी पक्ष कोणत्या कारणासाठी सोडला आहे. त्यामुळे ‘विचार-आचार’ असे जड शब्द त्यांनी वापरू नयेत. आपली निष्ठा सिद्ध करण्यासाठी ह्या आयात नेत्याना पवार साहेबांवर टिका करावी लागते. ताईंची अवस्था म्हणजे , “नया मुल्ला जोर से बांग देता है” अशी झाली आहे.” अशा प्रकारे जोरदार प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.