वाघ पंजाही मारु शकतो, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा भाजपला इशारा!

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी भाजप वरती टीका केली. ते म्हणाले की “कोणाशी मैत्री करायची हे वाघाच्या मनावर अवलंबून असतो. वेळ पडल्यास वाघ पंजाही मारु शकतो, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला दिला आहे.

पत्रकारांनी विचारले की “काही दिवसात शिवसेना भाजप विरुद्ध मवाळ भूमिका घेत आहे का ? असा प्रश्न विचारला होता. त्यावर छगन भुजबळ म्हणाले की राज्याच्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारकडे आहेत त्यामुळे जमवून घ्यावे लागतं मात्र वाघ कधी पंजा मारेल सांगता येत नाही.

सध्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चांगलेच राजकारण महाराष्ट्रात पेटले आहे. यावरून महाराष्ट्रातील जनतेला चांगलाच कलगीतुरा पहायला मिळतो आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.