
बॅड कोलेस्ट्रॉल फक्त तीन दिवसात बाहेर फेका
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याचे मुख्य कारण आपल आहार आणि व्यायामाचा अभाव हे आहे. आहारात तेलकट, मसालेदार अन्न सतत खाल्ल्याने वजन वाढण्याबरोबरच बॅड कोलेस्ट्रॉल वाढते हे कोलेस्ट्रॉल ह्रदयासाठी अत्यंत घातक असून यामुळे ह्रदय विकाराचा धोका संभवतो, रक्तात ब्लाॅकेजेस होऊ शकतात. चालताना दम लागणे, घाम येणे, इ त्रास होऊ लागतात. या सर्वांवर उपाय म्हणजे कमी तेलकट तसेच चरबी कमी असणारा आहार खावा तसेच चालण्यासारखा व्यायाम करावा. आज आपण बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर फेकण्याचा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्याने तुमचे कोलेस्ट्रॉल विरघळून जाईल.
साहित्य
१) आल्याचा रस – २चमचे
२) लिंबू रस – २चमचे
३) मध – १चमचा
कृती
आल्याचा रस, लिंबू रस, मध एकत्र मिक्स करा व हे चाटण सकाळी अनुशापोटी चाटा, निरोगी व्यक्तीने हा उपाय आठवड्यातून दोनदा करा आणि ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी आठवड्यातून ४ वेळा हा उपाय करा. हा उपाय करण्याबरोबरच सात्विक आहार, व्यायाम यांची जोड द्या निश्चितच फायदा होतो.
कच्चा लसूणही कोलेस्ट्रॉल घटवण्यासाठी मदत करतो.