
‘या’ व्हिडीओमुळे दिशा पटानी झाली ट्रोल…
दिशा पटानी नेहमीच तिच्या ग्लॅमरस फोटो, व्हिडीओ, फिटनेस यामुळे समाज माध्यमांवर सतत चर्चेत असते. तिच्या फिटनेसने तिने चाहत्यांना घायाळ केले आहे. दिशाच्या पोस्टवर नेहमी चाहत्यांच्या लाईकचा वर्षाव पाहायला मिळतो. यावेळी मात्र दिशाच्या एका व्हिडीओने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तिच्या या व्हिडीओमुळे अनेक चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत.
दिशा पटानीने नुकताच एक व्हिडीओ समाज माध्यमांवर शेअर केला आहे. बोल्डनेस आणि फिटनेससाठी कौतुक होणाऱ्या दिशाने यावेळी मात्र नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. एल्सा मजिम्बो दिशाने शेअर केलेल्या व्हिडीओत ती केनियातील प्रसिद्ध कॉमेडियन एल्सा मजिम्बोची नक्कल करताना दिसतेय. यात ती समाज माध्यमांवर प्रसिद्ध असलेल्या एल्साच्या स्टाइलमध्ये बोलताना दिसतेय.” जर तुम्ही तुमचे पैसे खर्च केले नाहित तर कोण करणार?, जर तुमचे सर्व पैसै खर्च झाले तर काय होईल? मी पहिले उद्ध्वस्त झाले आहे. मी असं नाही केलं. जर मी पैसे खर्च करते, टॅक्स भरते म्हणजे मी माझ्या देशाचं भलं करते.”
दिशाने तिच्या या काही सेकंदाच्या व्हिडीओला खास कॅप्शन दिलं आहे, ‘प्रत्येक वेळी मी शॉपिंग करताना माझे डोके असे असते’. तर या व्हीडीओत ती मध्ये- मध्ये जोरजोरात हसताना दिसतेय. मात्र नेटकऱ्यांना तिचा हा अंदाज काही आवडलेला नाही. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.
तिच्या या व्हिडिओला अनेक जणांकडून प्रतिक्रिया आल्या. अनेकजण मीम्स तयार करून दिशाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. काही युजरने ‘मला काही नाही समजलं’ असं म्हणणाऱ्या अंगुरी भाभीचा फोटो शेअर केले तर काहींनी “ओव्हर अॅक्टिंगचे 50 रुपये कट”. असे म्हणत तिची खिल्ली उडवली आहे.