भारत-पाकिस्तान सामन्याआधीच केली सानिया मिर्झाने ही पोस्ट,सिक्सर किंग युवराज ने दिली ही भन्नाट कमेंट..!

0

खरंतर क्रिकेट च्या जगात भारत-पाकिस्तान चा सामना म्हणजे एक वेगळाच रोमांच असतो.हा सामना साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेणारा असतो,आणि असाच सामना यावर्षी टी २० विश्वचषकामध्ये पहायला मिळणार आहे. २४ ऑक्टोबर भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रंगणार असून त्याबद्दलच्या चर्चा आतापासूनच सुरु झाल्या आहेत.

दोन्ही देशातील राजकीय नेत्यांपासून खेळाडूंपर्यंत अनेकजण या सामन्याबद्दल वेगवेगळी वक्तव्य करत असतानाच भारताची स्टार टेनिसपटू आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकची पत्नी सानिया मिर्झाने या सामन्याआधीच एक महत्वाची पोस्ट आपल्या सोशल मीडिया वरून दिली आहे.

सानिया मिर्झाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर करत आपण आता काही दिवस सोशल मीडियापासून दूर राहणार असल्याची माहिती चाहत्यांना दिलीय. सानियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काही अक्षरांच्या माध्यमातून हा संदेश देण्यात आलाय.

“मी भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्याच्या दिवशी सोशल मीडिया आणि टॉक्सिसिटी (वाई़ट वातावरणापासून) दूर राहण्याच्या हेतूने गायबच असेल,” असं म्हटलं आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सानिया मिर्झाने कॅप्शनमध्ये, ‘बाय-बाय’ असं लिहिलं आहे.

आणि तिची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि त्यावर आपल्या सिक्सर किंग युवराज सिंग ने कॉमेंट सुद्धा केली आहे.युवराज म्हणतो की ,“चांगला विचार आहे,” असं युवराजने म्हटलंय.सानियाने शोएब मलिकसोबत लग्न केल्यापासून बऱ्याचदा सोशल मीडियावर पाकिस्तानी नवऱ्याचा संदर्भ देत ट्रोल केलं जातं.

यापूर्वीही तिने अशाप्रकारे भारत पाकिस्तान सामन्यांच्या वेळेस सोशल माध्यमाच्या वातावरणापासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याचं पहायला मिळालं होतं. सानियाचा पती शोएब मलिकला अगदी शेवटच्या क्षणी टी २० विश्वचषकासाठीच्या संघामध्ये स्थान देण्यात आलं आहे.

जखमी झालेल्या सोहेब मकसूदच्या जगी शोएबला संधी देण्यात आली आहे. शोएब भारताविरुद्धचा सामना खेळण्याची दाट शक्यता आहे.खरंतर ह्या सामन्याची वाट अख्या जगाला लागून आहे,कारण हा नुसतं सामना नसतो तर एक थरार असतो.

सामना सुरू व्हायच्या आधीच विविध खेळाडूंनि यावर वाकयुद्ध चालू केलं आहे,पण अद्यापही भारतीय खेळाडूंनी यावर आपलं मत व्यक्त केलं नाही,आता ते सामन्यात प्रदर्शन करून दाखवतील आणि भारताला हा सामना जिंकवतील अशीच अपेक्षा तमाम भारतीयांना लागून आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.