मराठी ची ही लोकप्रिय अभिनेत्री ह्या कारणाने आहे अंथरुणाला खिळून,वाचून तुम्हालाही धक्का बसेल…!

0

मराठी ची लोकप्रिय मालिका, पाहिले न मी तुला या लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्रीचा नुकताच भीषण अपघात झाला आहे. ह्या अभिनेत्री म्हणजे वर्षा दांदळे. वर्षा दांदळे यांनी पाहिले न मी तुला या मालिकेत उषा मावशीची भूमिका साकारली होती.

आजवर त्यांनी साकारलेल्या भूमिकांचे प्रेक्षकांनी नेहमीच भरभरून कौतुक केले आहे. वर्षा दांदळे यांनी आपल्या अपघाताची बातमी नुकताच इन्स्टाग्राम वर शेअर केली आहे. यामध्ये या अपघाताने त्यांची प्रकृती खूप जास्त खालावली असल्याचे दिसून येते.

या अपघातात त्यांच्या पाठीला जबर दुखापत झाली आहे त्यामुळे मणक्याच्या त्रास त्यांना वाटू लागला आहे आणि उजव्या पायाला सुद्धा गंभीर दुखापत झाली आहे.ह्या भीषण अपघातामुळे त्यांची परिस्थिती देखील खूपच नाजूक झाली असल्याचे त्या सांगतात. सध्या कुठलीच हालचाल होत नसल्याने त्या आता झोपूनच आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहेत.

ह्या अवघड परिस्थितीतुन त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात अशी ईच्छा त्यांच्या चाहत्यांनी केली आहे.खरंतर वर्षा दांदळे या मूळच्या अकोल्याच्या आहेत लग्न करून त्या मुंबईत स्थायिक झाल्या. अभिनयाचा त्यांचा प्रवास खूपच संघर्षशील असाच आहे.

संगीत शिक्षिकेची नोकरी करत असताना त्यांनी नाटकात काम करण्यास सुरुवात केली. प्रेक्षकाना त्यांच्या भूमिका खूप आवडू लागल्या. पुढे झी मराठी वाहिनीवरील नांदा सौख्य भरे या मालिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. या मालिकेत त्यांनी साकारलेली वच्छी अत्याची भूमिका खूपच गाजली होती. याच नावाने त्यांना ओळख देखील मिळाली होती.

शिवाय वच्छी आत्या लग्न जुळते म्हणून खऱ्या आयुष्यात अनेकांनी त्यांच्याकडे लग्न जुळवून देण्यासाठी पत्रिका आणून दिल्या होत्या. १९९९ साली त्यांनी नाटकाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते २००५ साली वच्छी आत्याच्या भूमिकेने त्यांची छोट्या पडद्यावर एक वेगळीच ओळख निर्माण केली .

त्यांनतर” नकटीच्या लग्नाला यायचं हं “या मालिकेत त्यांनी लता काकूची भूमिका साकारली मग घाडगे आणि सूनमधील सुकन्या कुलकर्णीची मोठी जाऊ, आणि मलवणी डेज मधली मालवणी काकू अशा त्यांच्या सगळ्याच भूमिका प्रेक्षकांना खूपच भावल्या.

कृपा-सिंधू या स्वामी समर्थांच्या मालिकेतील सुंदरा बाई या भूमिकेने त्यांना खरंतर प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. ही कर्मभूमी त्यांची रंगत असताना आज मात्र त्यांच्यावर काळाने घात केला असून त्यांच्या वर मोठे संकट ओढवलेले दिसत आहे.

त्यांनी त्यांच्या चाहत्यांना विनंती केली आहे एका पोस्ट च्या माध्यमातून,“आपकी दुवा कि जरुरत हे” म्हणत त्यानी सोशिअल मीडियावर चाहत्यांना प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांचे चाहते देखील त्या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी कमेंट करताना पाहायला मिळत आहेत.

खरंतर माणसाला कधी कधी संपत्ती कामी येत नाही तर केलेलं कर्म आणि कमावलेली माणसाच्या मनातील प्रार्थना कामी येतात ही वस्तुस्थिती आहे.ओळख ही कायमस्वरूपी असतं असं नाही,पण आपलं कर्तुत्व हे कायमस्वरूपी चं असतं ही वस्तुस्थिती आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.