
गडांचा राजा राजियांचा गड राजगड पुणे शहरापासुन जवळपास 60 किलोमिटर वर वेल्हे तालुक्यात असनारा हा किल्ला स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो शिवरायांनी या गडाचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जात असे गड जिंकताच महाराजांनी किल्ला बांधण्याचे काम झपाट्याने सुरू केले किल्ल्यावर पद्मावती सुवेळा संजीवनी अश्या तीन माच्या असंख्य लहान मोठी मंदिरे दारू खाना दिवाणघर राजवाडा पागा अश्या अनेक वस्तू होत्या प्रत्येक माची व बालेकिल्ल्यावर पाण्याची पुष्कळ सोय होती या गडाने छत्रपती राजारामांचा जन्म अनुभवला तसेच सईबाईंचा मृत्यू ही सोसला अफजलखानाच्या वधासाठी महाराज याच गडावरून बाहेर पडले आणि आग्रा येथील औरंगजेबाच्या कैदेतून सुटका झाल्यावर त्यांनी पाहिले पाऊल ही राजगडावरच टाकले स्वराज्याचे पहिले पाऊल ते हिंदू सत्तेचा तो उत्कर्ष सारेच या गडाने पाहिले घरातील एखाद्या बुजूर्गाच्या नात्याने शिवरायांवर सतत आशीर्वादाचा मायेचा हात ठेवणारा असा हा राजीयांचा गड आणि गडांचा राजा