हा तर सरकार पाडण्याचा कट; राष्ट्रवादीच्या प्रतिहल्ल्या नंतर नाना पटोलेचे यांचे विधान!

0

महा विकास आघाडी मध्ये अंतर्गत वाद असल्याचे सातत्याने चर्चा होताना दिसून येते. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सातत्याने आक्रमक होत बोलताना दिसून येतात. स्वबळाचा नारा सुद्धा नाना पटोले यांनी पुढील निवडणूकीच्या दृष्टीने महाराष्ट्रामध्ये दिला आहे. यामुळे भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमध्ये अंतर्गत वाद असल्याचा वारंवार आरोप करत संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहे

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यातील लोणावळा येथे केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे नाना पटोले यांच्या वरती चांगलीच टीका महा विकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांनी केली आहे. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून नाना पटोले यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

नाना पटोले म्हणाले होते की “महाराष्ट्रात काँग्रेस उभी राहत आहे हे त्यांना माहीत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. मी कुठे काय करतो ते सगळं त्यांना माहीत आह”‘, असं म्हणत नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप केला होता.

आज बोलत असताना नाना पटोले म्हणाले की “माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मनगढत कहाण्या रचून आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याचा डाव सुरू आहे. पण विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपवर पलटवार केला.

पटोले यांनी म्हटलं की, मी परवा पुण्यात होतो. त्यावेळी कार्यकर्त्यांनी काही तक्रारी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर त्रास होत असल्याचं कार्यकर्ते सांगत होते. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, दौरे सुरू आहेत. काँग्रेसला प्रचंड प्रतिसाद वाढला आहे. त्याचा रिपोर्ट रोज मुख्यमंत्र्यांकडे जातो. हा रिपोर्ट केवळ राज्य सरकारकडेच नाही तर केंद्र सरकारडेही जात असतो.मी प्लेनली बोललो होतो. मात्र त्याचा विपर्यास केला गेला, अशी माहिती द्या नाना पटोले यांनी स्पष्टिकर करताना दिली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.