दाट, आकर्षक आयब्रोंसाठी करा हे घरगुती उपाय

0

 

सुंदर चेहरा नेहमीच लक्ष वेधून घेतो. चेहरा आकर्षक दिसण्यासाठी नाक, डोळे, महत्वाची भूमिका निभावतात तसेचडोळ्यांर असणार्या आयब्रो सौंदर्य वाढवण्यात मदत करतात. कमानदार भुवया सौंदर्य वाढवण्याबरोबरच लक्ष वेधून घेतात.वाढलेल्या आयब्रो दर महिन्याला करून घेतल्या जातात.काहीजणांना आयब्रो विरळ आसतात परिणामी, चेहरा आकर्षक बनविण्यासाठी आयब्रो मुख्य भूमिका निभावतात. चेहऱ्याच्या आकारानुसार भुवईचा आकार असतो. परंतु फारच कमी मुली आहेत ज्यांच्या भुवया नैसर्गिकरित्या काळ्या-दाट आहेत. प्रत्येक मुलीला दाट भुवया हव्या असतात. यासाठीच काही घरगुती उपायान भुवया दाट कशा कराव्यात हे आपण पाहणार आहोत.
१) भुवया दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी नियमित बदामाच्या तेलाने भुवयांची मसाज केल्यास भुवयांचे केस दाट आणि काळे होतात. बदामाच्या तेलात व्हिटामीन ई मोठ्या प्रमाणावर असतं. ज्यामुळे आपले केस मजबूत होण्यास मदत मिळते.
२) भुवया दाट बनविण्यासाठी रात्रभर पाण्यात मेथीचे दाणे भिजवून सकाळी त्या मेथीदाण्याची पेस्ट करा. आंघोळ करण्यापूर्वी ही पेस्ट आपल्या भुवयांवर लावा. या पेस्टमुळे त्वचेचे पोषण होते. भुवयांचे केसही दाट होण्यास मदत होते.
३) भुवया दाट बनविण्यासाठी थोड्या नारळ तेलात लिंबाचे काही तुकडे घाला आणि मिक्सरमध्ये बारीक करा. हे मिश्रण रात्रभर भिजवा. नंतर दुसऱ्या रात्रीपासून कापसाच्या मदतीने हे मिश्रण आपल्या भुवयावर लावा. रात्रीच्या वेळी हे दररोज करा.
४) भुवया दाट बनविण्यासाठी रात्री झोपण्याआधी जास्वंदीच्या फुलाची पेस्ट हलक्या हाताने आपल्या भुवईवर लावा सकाळी झोपेतून उठल्यावर कोमट पाण्याने आपला चेहरा धुऊन टाका.
५) जास्वंदीच्या फुलाची पेस्ट लावल्याने केसांची मूळ घट्ट होण्यास मदत होते.
६) भुवया दाट बनविण्यासाठी कोरफडची पाने सोलून घ्या आणि त्यातील गर काढा आणि भुवयावर लावा.
७) बाजारामध्ये मिळत असलेले एलोवेरा जेल वापरू शकता.
८) भुवया दाट बनविण्यासाठी कांद्याच्या रसाचा वापर करू शकता यासाठी कापसाच्या बोळ्याने कांद्याचा रस भुवयांवर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण अधिक असतं. यामुळे भुवयांवरील केसांची वाढ होण्यास मदत मिळते.
९) भुवया दाट बनविण्यासाठी आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकता यासाठी एक चमचा एरंडेल तेल कापसावर घ्या. आणि ते आपल्या भूवायावर लावा. हलक्या हाताने दोन मिनिट चोळा.१० ते १५ मिनिट राहूद्या नंतर कोमट पाण्याने धुऊन टाका.
महत्वाची टीप: वरील माहिती संकलित केलेली असून प्राईम महाराष्ट्र याची कोणतीही हमी देत नाही. कोणतीही कृती स्वतःच्या जोखमीवर करावी. हि माहिती विविध संदर्भ घेऊन संकलित करण्यात आलेली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.