या घराला नाहीये कुठला शेजार पाजार, तरीही आहे नंदनवन

0

माणूस हा निसर्गतःच समाजप्रिय प्राणी आहे. जगातील इतर प्राणी जसे कळपाने राहतात, तसाच माणूससुद्धा वस्ती करून राहतो. एकलकोंडा, एकटा आणि समाजापासून विलग होऊन राहणारा माणूस विरळाच. पण जगात अनेक आश्चर्य आहेत. आणि त्यातली काही अशी आहेत की ज्यावर आपला विश्वास देखील बसणार नाही.

हा लेख अशाच एका आश्चर्यावर आहे. एका घरावर. तुम्ही विचार कराल, काय आहे बाबा या घरावर एवढं लेख लिहिण्यासारखं तर ऐका! आयर्लंडच्या दक्षिण समुद्रात एक निर्जन बेट आहे आणि त्या बेटावर आहे पांढऱ्या रंगाचं एकच घर! तरीही काही विशेष वाटत नसेल तर अजून पुढचं ऐका!

या बेटापासून नजर जाईल तिथवर पसरलेला आहे, समुद्रच समुद्र आणि अशा समुद्राच्या निळ्याशार वाळवंटात बांधलेलं आहे, हे पांढऱ्या रंगाचं घर! पण एखाद्या निर्जन बेटावर एकटाच टुमदार घर कोण आणि का बांधील? कोणालाही हा प्रश्न सहाजिकच पडेल, चला तर मग जाणून घेऊयात,

ज्या बेटावर हे घर आहे, त्या बेटाचे नाव आहे ‘एलीदोय’. हे बेट दूर समुद्रात आहे. आणि असं म्हणतात की हे घर जगातील सर्वात निर्जन जागी असणारे घर आहे. हे घर कोणी बांधले आणि त्या आधी तिथे कोण राहत होतं, याबद्दल सगळ्यांना प्रश्न पडतो. तसेच या घराबद्दल अनेक सुरस कथाही रचल्या गेल्या आहेत.

याबद्दल अशी एक अफवा आहे की, ‘एलीदोय’ हे बेट आयर्लंडच्या सरकारने विसाव्या शतकात, एक प्रसिद्ध पॉप सिंगर बिजोर्कला भेट म्हणून दिले होते. बिजोर्कला एकांतात घर बांधायचे होते आणि एलीदोय बेटावर एक रेकॉर्डिंग स्टुडिओसुद्धा उघडायचा होता. परंतु, यावरूनच बिजोर्कचे आयर्लंड सरकारसोबत भांडण झाले.

तसेच, या घराबद्दल अजून एक अफवा अशी आहे की, या बेटावरचे ते घर एका कोणत्या तरी करोडपती माणसाने बांधले आहे. ‘झाँबी ऍपोकॅलिप्स’च्या निमित्ताने त्याला आपल्या कुटुंबासोबत तिथे राहायला जायचं होतं. एवढंच नाही तर, ते घर अस्तित्वातच नसून, कुणीतरी फोटोशॉप करून तो फोटो बनवला असल्याच्या अफवाही पसरवण्यात आल्या होत्या.

खरं काही वेगळंच आहे. अधिक खोलात जाऊन या बेटाबद्दल जाणून घेतलं तर असा इतिहास वाचायला मिळतो की, बेटावर अठराव्या शतकापासून काही लोक राहत होते आणि साधारण १९३० च्या नंतर ते सगळे बेट सोडून इतरत्र स्थायिक झाले. शेवटी त्यांच्यातील काही मोजकीच कुटुंबं त्या बेटावर उरले. कालांतराने त्यांनीही या बेटाचा निरोप घेतला आणि तेव्हापासून ते बेट निर्जन बनलं.

दरम्यानच्या काळात एलीदोय बेटावर मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पफिन पक्ष्यांची शिकार करण्यासाठी, शिकारी हळूहळू एलीदोयवर येऊ लागले. त्यांची संघटना स्थापन झाली आणि या ‘एलीदोय हंटिंग असोसिएशन’ने शिकाऱ्यांच्या सोयीसाठी बेटावर बांधकाम करायचे ठरवले.

या सर्व लोकांच्या सोयीसाठी तिथे एक हंटिंग लॉज बांधण्यात आला, पण हा लॉजपेक्षा जगातल्या इतर लॉजपेक्षा फारच वेगळा आहे! इथे पावसाचं साठवलेलं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, इतर मूलभूत गोष्टीसुद्धा इथे नाहीत. काळाच्या ओघात ही संघटना देखील बंद पडली आणि आता हे बेट पफिन पक्षांच्या अधिवास झालं आहे. बऱ्याच पक्षांनी तेथे घरटी बांधली आहेत. मनुष्यवस्ती नसल्यामुळे हळूहळू इतर समुद्री पक्षी देखील येथे राहत आहेत. खऱ्या अर्थाने हे बेट आता नंदनवन  झालं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.