
दाताची योग्य निगा राखणे गरजेचे असून दात दिवसातून किमान दोनदा घासावेत, बरेचजणांना दात घासण्याचा कंटाळा येतो, मिनिटात दात घासून पूर्ण करतात. यांमुळे दात पिवळे पडणे, अन्नाचे कण दाताच्या फटीत अडकून दात किडणे असे प्रकार होतात. पांढरे शुभ्र दात तुमच्या हास्याचे सौंदर्य वाढवतात. पिवळे दात, मुख दुर्गंधी आरोग्यास हानिकारक आहेच परंतु सौंदर्यातही बाधा आणते. आज आपण या सर्वांवर घरगुती रामबाण उपाय पाहणार आहोत.
साहित्य
१) तुळशीची पाने – ४०
२) लिंबू – अर्धा
३) खोबरेल तेल – २ चमचे
कृती
तुळशीची पाने सावलीत वाळवा साधारण दोन दिवसात सुकतात. ही पाने मिक्सरला फिरवून पावडर करून घ्या यात लिंबू रसाचे दोन ते तीन थेंब टाका. यात खोबरेल तेल घाला व पेस्टप्रमाणे लेप तयार करा. हा लेप बोटाने किंवा ब्रशने दातावर मंजन करा. साधारण दोन मिनिटे याने दात स्वच्छ घासा. हा उपाय रोजचे दात घासण्याव्यतिरिक्त करा.
वरील उपाय साधारण पंधरा दिवस करा, याने तुमचे दात पांढरे होण्याबरोबरच मुख दुर्गंधी, किड दूर होते. वरील उपाय आवडल्यास आमच्या पेटला लाईक करा.