यामुळे आपटले शेयर मार्केट!

0

जागतिक मार्केटकडून मिळालेल्या कमजोर निर्देशनांमुळे शुक्रवारी शेअर बाजारामध्ये जोरदार घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ४९९९० वर बंद झाला आहे,भारतीय मार्केट ३.८०% खाली पडले ,२०२१ मधील बाजारातील ही सर्वात मोठी घसरण आहे.कमकुवत जागतिक मार्केटच्या पार्श्वभूमीवर सेन्सेक्स २१४८ अंकांनी घसरला आणि दिवसाची सर्वात नीचांकी पातळी ४८८८० गाठली होती. अशीच मोठी घसरण ४ मे २०२० रोजी एका दिवसात दिसून आली जेव्हा निर्देशांक दोन हजारांपेक्षा जास्त अंकांनी घसरला होता.

बँकिंग आणि वाहन क्षेत्रातील शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी सर्वाधिक विक्री केली. म्हणूनच निफ्टी बँक निर्देशांक ४.८०% खाली येऊन बँक निफ्टी ३४८०३ वर जाऊन आला व वाहन निर्देशांक देखील खाली आला आहे. निफ्टीही १४५२९ ला ३.७६% खाली बंद झाला. भारतीय बाजार सुरवातीपासून कमजोर दिसून आले.

एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, इंडसइंड बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्यासह अन्य प्रमुख बँकिंग समभागांमध्ये ५ ते ८ टक्क्यांनी घट झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस आणि भारती एअरटेलही २-२ टक्क्यांहून अधिक खाली बंद झाले. याचा परिणाम म्हणजे मार्केट कॅपच्या बाबतीत १० मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांची मार्केट कॅपमध्ये सुमारे 1 लाख कोटी रुपयांनी खालावली.

जगातील बाजारांची विक्रीची भावना ही अमेरिकेतील वाढते रोखे उत्पन्न आहे. याव्यतिरिक्त, अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावातूनही या घटनेला पाठिंबा मिळाला. मध्यम मुदतीत निफ्टी निर्देशांक १४६०० पातळी तोडू शकतो. गुंतवणूकदारांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक ठेवण्याचा सल्ला ब्रोकरेज संस्था कडून देण्यात आला आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.