हे सरकार पाच वर्षे टिकेल – शरद पवार

0

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २२ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवार बोलत होते. राज्यातील राजकीय परिस्थिती बाबत भाजप कडून सतत सांगितले जाते की राज्यातील सरकार हे कोसळेल असे वेळोवेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. मात्र यावर शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार म्हणाले की “इंदिरा गांधी यांना दिलेला शब्द बाळासाहेब यांनी पाळला होता. इंदिरा गांधींना मदत करण्यासाठी सेनेने एक उमेदवार दिला नाही, बाळासाहेब ठाकरे यांनी इंदिरा गांधी यांना शब्द दिला होता तो पाळला हा इतिहास आहे. शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष आहे. त्यामुळे हे सरकार पाच वर्षे टिकेल. असे त्यांनी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सांगितले.

तसेच शरद पवार म्हणाले “आपण महाविकास आघाडीचा पर्याय दिला, लोकांनी तो पर्याय स्वीकारला. आजच्या घडीला महाविकास आघाडी सरकार उत्तमरित्या काम करत आहे. येणारी विधानसभा आणि लोकसभा निवडणूक एकत्रित लढवण्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.