बस कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आमदार रोहित पवार यांनी केली ही मागणी!

0

कर्जत जामखेड चे आमदार रोहित राजेंद्र पवार हे सतत लोकोपयोगी भूमिकांच्या मुळे माध्यमांमध्ये चर्चेत असतात. ग्राउंड वरती आणि मीडियावर रोहित पवार कामाच्या बाबतीत कायम पुढाकार घेताना, सकारात्मक चर्चा करताना दिसून येतात.

रोहित पवार यांना मानणारा तरुण वर्ग हा त्यांच्या भूमिका पाहून मोठ्या संख्येने वाढताना दिसून येतो आहे. काम करणारा माणूस आज लोकप्रिय होत आहे असे सगळीकडे चित्र आहे. अशातच त्यांनी बस चालक आणि वाहक यांच्या बाबतीत एक ट्विट करून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना एक विनंती केली आहे. काय म्हणाले आहेत पाहू या!

“एसटीचे चालक आणि वाहक हेही महत्त्वाचं काम करतात आणि त्यांचाही अनेक लोकांशी जवळचा संबंध येत असतो. त्यामुळं ‘फ्रंट लाईन वर्कर’ म्हणून त्यांचंही प्राधान्याने लसीकरण करण्यात यावं, ही विनंती”

या ट्विट ला लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच लोकांच्या मनातील भावना त्यांनी व्यक्त केल्याची चर्चा ट्विटर वरती दिसून येते आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.