
ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, दुसरं काय? ‘केले तुका झाले माका’; राऊतांचा निशाणा
काल भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांचे विधानसभा अध्यक्षांनी एक वर्षासाठी निलंबन केले. या निलंबन आवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलेच राजकारण रंगले. विधानसभेच्या आवारात प्रतीविधानसभा निर्माण करून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
संजय राऊत यांच्याशी या आमदारांच्या निलंबनाचा वरून संवाद साधला असता संजय राऊत म्हणाले की ” काल सरकारची वेगळ्या प्रकारे कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू होता. पण विरोधकांचं केलं तुका झालं माका असं झालं. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
भारतीय जनता पक्षाने सत्ताधारी पक्षाला घेरण्याची चांगली फिल्डिंग लावली होती. मात्र भारतीय जनता पक्षाच्या आततायीपणा मुळे प्रकरण पूर्ण 180 कोनात फिरले आणि भाजपच्या चांगलेच अंगलोट आले आहे. यावरती संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाची चांगलीच हजेरी घेतली आहे. “आमच्या वर बॉम्ब टाकणार होते, पण बॉम्ब त्यांच्या हातात फुटला. अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली आहे.