
या दोन मराठी सेलिब्रेटींनी साधेपणान यंदा केल लग्न; गेल्यावर्षी गुपचूप उरकला होता साखरपुडा
गतवर्षीपासून कोरोना संकट देशावर आल्यापासून सर्वच सामाजिक कार्यक्रमावर निर्बंध आले. गर्दी टाळण्याच्या दृष्टीने ते आवश्यकही होते. मराठीत सध्या अनेक नवोदित कलाकारांची रेलचेल असून या नव्या पिढीचे विचारही आधुनिक आहेत. हे नवोदित कलाकार लिव इन रिलेशनशिपमध्येही राहत आहेत. पण बरेच कलाकार परंपरांना आधुनिकतेची जोड देत विवाहबध्द होताना दिसत आहेत.
२०२० साली असच एक नवोदित कलाकार जोडप ऋचा आपटे आणि क्षितिज दाते यांनी गुपचूप साखरपुडा उरकला होता. ‘गेल्या वर्षी याच दिवशी’ असे कॅप्शन देत त्यांनी साखरपुड्याचे फोटो २०२१ साली शेअर केले होते. ऋचा आपटे आणि क्षितिज दाते या दोघांनी बन मस्का या झी युवा वाहिनीवरील मालिकेत काम केले होते. मालिकेदरम्यान दोघांत प्रथम मैत्री व नंतर प्रेमसंबंध जुळून आले.
दोघे एकमेकांना बरेच दिवस डेट करत होते. दरम्यान क्षितिजची मुळशी पॅटर्न चित्रपटातील भूमिका चांगलीच गाजली होती. सध्या तो सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात भूमिका निभावत आहे. ऋचा आपटेनेही मालिकेत स्वताचे स्थान निर्माण करत तुझ्यात जीव रंगला, अस्स माहेर नको ग बाई या मालिकेत भूमिका निभावली. यावर्षी या दोघा तारकांनी परंपरागत पध्दतीने पुण्यात साधेपणान आणि मोजक्या नातेवाईकांसह विवाह उरकून घेतला. विवाहाची बातमीही या दोघांनी लिक केली नसून त्यांच्या मित्रमंडळीनींच लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.