ह्रदयविकाराचा झटका येण्यापूर्वी शरीरात ही लक्षणे दिसून येतात.

0

भारतात ह्रदय विकाराचा झटका येऊन मरणार्यांची संख्या लक्षणीय असून बहुतांशवेळा उपचाराला वेळ केल्यानंतर व्यक्तीला झटका येण्याची शक्यता बळावते. ह्रदय विकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण बरेचदा कोलेस्ट्रॉल हे असते.ह्रदय रोगात रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचे थर रक्तप्रवाह पूर्णपणे ब्लॉक करतात. आणि यामुळे ह्रदयाला आॅक्सीजनयुक्त रक्तपुरवठा होणे थांबते यामुळे छातीत तीक्ष्ण वेदना सुरू होतात, यालाच ह्रदय विकाराचा झटका म्हणतात. ह्रदय विकाराचा झटका येण्यापूर्वी काही प्रमुख लक्षणे आढळतात ती पुढीलप्रमाणे

१) ह्रदय विकारात चालल्याने, जीना चढल्याने छातीत दुखायला लागून श्वासोश्वास जलद होऊन गुदमरायला लागते. इंग्रजीत याला अँजीना पेक्टेरिस म्हणतात.
२) ह्रदयविकाराच्या सुरुवातीला काहिही कारण नसताना अचानक काही सेकंदासाठी चक्कर येऊ शकते.
३) काहिही श्रम न करता दरदरून घाम फुटू शकतो. अस्वस्थ वाटते.
४) विनाकारण खोकला येतो.

ह्रदय विकाराचा झटका येण्याची ही काही सर्वसामान्य लक्षणे असून अधिक माहितीसाठी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण केव्हाही चांगल. काहीवेळा पित्त किंवा इतर सर्वसामान्य तक्रार असेल म्हणून या लक्षणांकडे दुर्लक्ष केल जात, परिणामी लक्षणे जाणवत असल्यास नजीकचा डॉक्टरला भेटून योग्यवेळी धोका टाळावा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.