मुख्यमंत्री सहायता निधीसाठी महाराष्ट्रातील हे आमदार सरसावले!

0

मागील वर्षी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला महाराष्ट्रातील जनतेने जोरदार प्रतिसाद देत २४७ कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधिला मदत केली होती.

सध्या महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. अशा परिस्थिती मध्ये महाराष्ट्र सरकार हे कोरोनाशी लढा देत आहे. राज्य सरकारला स्वतः हुन लोक मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करून सहकार्य करत आहेत. याच गोष्टीची पुष्टी करत महाराष्ट्राचे महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात एक वर्षाचे वेतन हे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत व काँग्रेस चे आमदार एका महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देणार आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसने सुद्धा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या अडचणीच्या काळात सक्षमपणे उभा राहण्याची गरज आहे. स्वतः पासून सुरुवात करत काँग्रेस ने मदतीचा हात पुढे केला आहे. राजकारणाचा चांगला पायंडा हा महाराष्ट्रात रुजू होतो आहे ही जमेची बाब आहे!

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.