भाजप मध्ये गेलो चूक झाली; शुध्दीकरण करून इन्कमिंग

0

पश्चिम बंगाल येथील निवडणुकांमध्ये चांगलाच भाजप आणि तृणमूल काँग्रेसला असा सामना रंगला होता. भारतीय जनता पक्षाचे देशातील महत्त्वाचे नेते पश्चिम बंगालमध्ये विजयश्री खेचून आणण्यासाठी ठाण मांडून बसले होते. मात्र आपल्या राजकीय कौशल्यावर ममता बॅनर्जी यांनी एकहाती बहुमत मिळवत सरकार स्थापन केले.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला मात दिल्यानंतर आता पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरण फिरले आहे. तृणमूल काँग्रेसला चांगले दिवस यायला लागले आहेत निवडणुकीच्या अगोदर कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली होती आणि भाजप मध्ये पदार्पण केले होते. मात्र ती परिस्थिती आता राहिलेली नाही भाजपमध्ये गेले कार्यकर्ते आज तृणमूल काँग्रेस मध्ये येताना दिसत आहेत. निवडणुकीआधी सुरू असलेले आऊटगोइंग आता इनकमिंगमध्ये बदलले आहे. विशेष म्हणजे भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते चक्क शुद्धीकरण करून तृणमूलमध्ये सहभागी होत आहेत.

हुगली जिल्यातील २०० कार्यकर्त्यांनी भाजपला राम राम करत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मुंडण करून गंगाजलाने शुद्धीकरण करुन घेतलं. भाजपमध्ये प्रवेश करणे ही आपली खूप मोठी चूक होती, असे म्हणत तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.