
थोडी माणुसकी असायला हवी होती; अजित पवारांनी व्हेंटिलेटर्सच्या प्रश्नावर व्यक्त केली खंत
कोरोना मध्ये नागरिकांचे आरोग्य सुविधा मिळण्यासाठी प्रचंड हाल झाले. इतकेच नव्हे तर कित्येक लोकांना शहरभर फिरून वैद्यकीय सुविधा न मिळाल्यामुळे शहरे बदलून उपचार घ्यावे लागले. गरीब असणाऱ्यांना, आर्थिक सक्षम नसणाऱ्यांना आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागला.
केंद्र सरकारने करोनासंदर्भातील साहित्य खरेदीसाठी आणि मदतीसाठी पीएम केअर्स फंड स्थापन केला होता. या फंडातून राज्यांना व्हेंटिलेटर्स देण्यात आली होती. महाराष्ट्र राज्याला देण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बंद निघाले, इतर राज्यात सुद्धा हीच समस्या आढळून आली. बंद व्हेटिलेटर्सच्या मुद्द्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खंत व्यक्त केली. तसेच “करोनाच्या काळात मला याचे राजकारण करायचे नाही, पण यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सुद्ध केंद्राकडे तक्रार केली आहे,” अशी माहिती अजित पवार यांनी दिली.
सातारा दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की साताऱ्याला ही व्हेंटिलेटर्स मिळाले आहेत. मात्र ही व्हेंटिलेटर्स चालत नाहीत, असा तक्रार वाजा प्रश्न अजित पवार यांनी आज साताऱ्यातील परिस्थिती पाहणी दौऱ्यात पत्रकारांशी बोलत असताना उपस्थित केला आहे.