
‘..तर आम्ही रावसाहेब दानवेंकडे शिकवणी लावूत’, संजय राऊतांचा खोचक टोला
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून सातत्याने मराठा समाजाकडून आंदोलने, पुनर्विचार याचिका, न्यायालयीन लढाई अशा विविध पातळीवर ती प्रयत्न सुरू असतात. मात्र मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत आरक्षण देणारा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवला. त्यामुळे राज्यातील मराठा समाजाच्या आशा मावळल्या आहेत अशा कालावधीमध्ये ‘महाविकास आघाडी’ सरकार सातत्याने प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
भाजपचे केंद्रीय रेल्वे, कोळसा व खणीज केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका केली होती. ‘शिवसेना नेत्यांचा आरक्षणावरील अभ्यास कच्चा आहे’ असे ते म्हणाले. यावर प्रत्युत्तर म्हणू संजय राऊत यांनी रावसाहेब दानवे यांनी टोला लावला होता.
या टीकेला तितकेच चोख उत्तर देत संजय राऊत यांनी हिशेब बरोबर केला आहे. संजय राऊत म्हणाले की, ‘आम्ही त्यांची शिकवणी लावू. त्यांची शिकवणी लावून मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटणार असेल तर तेही करू. इथे माझ्यापासून दोन पावलांवरच आमचे रावसाहेब राहतात. काही हरकत नाही. त्यांचा क्लास लावून टाकू, पण आरक्षण द्या. इथं विषय अभ्यासाचा नाही. भले भले अभ्यास करणारे लोकं मराठा समाजात आहेत. त्यांनी आरक्षणातील कायदेशीर किस काढला आहे’