चंद्रकांतदादा कडून मराठा आंदोलकांना उकसवण्याचे काम; मुश्रीफांचा प्रदेशाध्यक्षांवर हल्लाबोल!

0

महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. संभाजीराजे यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे मात्र कोरोणा ची परिस्थिती असल्यामुळे ते शांत असल्याचे दिसून येते. मात्र अशा परिस्थितीमध्ये राजकीय फायदा घेण्याच्या दृष्टीने चंद्रकांत पाटील यांच्याकडून आंदोलकांना उकसवण्याचे काम सुरू आहे, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत असताना म्हणाले “चंद्रकांतदादांना नेमके काय झाले आहे माहित नाही. सत्ता गेल्यामुळे ते अस्वस्थ झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनासंदर्भात संभाजीराजेंनी घेतलेली भूमिका योग्य आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत नागरिकांना काय त्रास झाला याची कल्पना त्यांना आहे. त्यामुळे संभाजीराजे संयमाने जात आहेत. सध्या अशाच सयंमी नेतृत्वाची गरज आहे. मात्र, चंद्रकांतदादा लोकांना मोर्चा, आंदोलन करण्यासाठी उकसवण्याचे काम करीत आहेत”. अशी टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील परिस्थिती आता हातात आली आहे. मात्र राजकीय हेतू पोटी कोणीतरी वक्तव्य करुन राज्यातील आरोग्य व्यवस्था गंभीर बनवण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांनी करू नये. अशा परिस्थितीमध्ये माणसांचा जीव हा महत्त्वपूर्ण आहे हे त्यांनी लक्षात घ्यावे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.