
यांच्या तोंडातून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील – रुपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आज चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी आज उत्तर प्रदेश राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी यांच्यावर चांगलीच तोफ डागली आहे.
मीना कुमारी म्हणाल्या होत्या की “उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा मीना कुमारी म्हणाल्या की मुलींना मोबाईल दिला नाही पाहिजे. मुली तास तास मोबाईल वर बोलतात आणि मग मुलांच्या सोबत पळून जातात” असे आक्षेपार्ह विधान त्यांनी केले होते. या विधानाच्या बातमीला रिट्विट करत रुपाली चाकणकर यांनी जोरदार उत्तर दिले आहे.
रुपाली चाकणकर म्हणाल्या की “आपण जर महिलांचे सक्षमीकरण करू इच्छित असू तर संघी महिलांना बोलण्यासाठी माईक देऊ नये. आपल्या ज्ञानाने त्या अश्मयुगामध्ये जगत आहेत, यांच्या वाणीमधून निघालेले शब्द आमच्या मुलींना पण अश्मयुगामध्ये घेऊन जातील”. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आज देशभरातून पावले टाकली जात असताना अशा प्रकारचे वक्तव्य महिलांच्या साठी योग्य नाही. त्यांच्या या विधानावरून चांगलेच राजकारण तापले आहे!