बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी बबली निघाले – रुपाली चाकणकर

0

दोन दिवसाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्ष विरोधक म्हणून स्ट्रॉंग भूमिका घेईल असे सर्वांनाच वाटत होते मात्र अतिउत्साहाच्या भरात मध्ये भाजप चांगलेच बॅकफूटवर गेले आहे. भारतीय जनता पक्षाचे १२ आमदार हे एका वर्षा साठी निलंबित करण्यात आले. या निलंबनाचे पडसाद दुसऱ्या दिवशीही उमटले. दरम्यान आ. रवी राणा यांनी शेतकरी मुद्द्यावरुन विधानसभेमध्ये गोंधळ घालत राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश मार्शल्सला दिले.

राजदंड पळवण्या वरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर चांगलेच आक्रमक झाल्या आहेत. या मुद्द्यावरून आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांच्यावर चांगलीच मिश्किल टिप्पणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर ट्विट करत म्हणाल्या “बायको जात चोरते आणि नवरा राजदंड, हे तर बंटी-बबली निघाले,” असं ट्विट रुपाली चाकणकर यांनी केलं असून अप्रत्यक्षपणे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.