भिजवलेले बदाम रोज सकाळी खाण्याचे जबरदस्त फायदे

0

भारतीय परंपरेत ड्रायफ्रूट ताकदीसाठी खाण्याची परंपरा जुनी आहे. पैलवानदेखील काजू, बदाम व थंडाई खातात. परंतु ताकदीबरोबरच ड्रायफ्रूटचे इतरही फायदे आहेत. बदामाचे काही औषधी फायदे आहेत. भिजवलेले बदाम खाल्ले तर आरोग्याला उपयुक्त असे अनेक फायदे प्राप्त होतात. आज आपण पाण्यात भिजवलेल्या बदामाचे फायदे पाहणार आहोत.

बदाम पाण्यात साधारण सहा ते सात तास भिजवून ठेवा नंतर ते सेवन करायचे आहेत.
१) भिजवलेले बदाम हे सुक्या बदांमांपेक्षा पचायला हलके असतात. भिजवलेल्या बदामामधून आपल्याला कॅल्शियम, लोह आणिमॅग्ननेशियम, व्हिटामिन इ. पोषक घटक मिळतात.
२) सालासकट भिजवलेले बदाम खाल्ले तर शरीरातील रक्ताची पातळी वाढण्यास मदत होते.
३) बदामात असलेल्या तांब्याच्या प्रमाणामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते.
४) सर्दी कमी करण्यासाठी भिजवलेले बदाम आणि गरम दूध यांचे एकत्रित सेवन करावे.
५) गरोदर स्त्रियांनी आपल्या दररोजच्या आहारात बदामाचे सेवन नियमित करावे. परिणामी खर्चाच्या मेंदूची आणि चेतन संस्थेची वाढ होते.
६) केसगळती कमी होते.
७) शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते. मधुमेह रुग्णांनी बदामाचे सेवन करावे.
८) बदामात असलेले कॅल्शियम आणि फॉस्फरस या घटकांमुळे हाडे व दात मजबूत ठेवण्यास मदत होते.
९) रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाण वाढते.

वरील फायदे हवे असतील तर रोज किमान चार बदाम भिजवून सकाळी अनुशापोटी महिनाभर खावे लागतील.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.