मनोरा दुरुस्त करता आला असता, मात्र फडणवीस सरकारच्या काळात घोटाळा झाला – सचिन सावंत

0

काँग्रेस चे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या मनोरा वसतिगृह पुनर्बांधणी दिरंगाई मुळे राज्याला मोठा तोटा झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच या मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.

सचिन सावंत यांनी असे ट्विट केले आहे. “फडणवीस सरकारनेच मनोरा वसतिगृह पुनर्बाधणीचा निर्णय २०१८ ला घेतला. त्यांच्याद्वारे नेमलेल्या एनबीसीसी या एजन्सीने आधीची वास्तू जमीनदोस्त केली. बांधकामाला विलंब झाल्यामुळे सरकारचे ₹७०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे – कारण दरमहा सुमारे ₹३.५ कोटी आमदारांना दिले जातात. (भाजपा आमदारांनाही प्रत्येकी १ लाख मिळतात) म्हणजे आजवर ₹ १५० कोटी!तसेच एनबीसीसीच्या विलंबामुळे प्रकल्प किंमतीत ₹ ५५० कोटी वाढ झाली. हे पाहून मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, वि.परिषद सभापती यांच्या उच्चस्तरीय समितीने प्रकल्प राज्य सा. बां. विभागाकडे देण्याचा निर्णय गतवर्षी घेतला”. असे सचिन सावंत म्हणाले.

पुढे सचिन सावंत म्हणतात” ₹८७५ कोटीची तरतूद केली. मार्च २०२१ला काम सुरू करण्यासाठी मुदत ठेवली. या चालू प्रक्रियेची सेंट्रल व्हिस्टाशी तुलना हास्यास्पद आहे.पंतप्रधानांना 7 लोककल्याण मार्गला निवास आहे. संसद व खासदारांसाठी निवासी परिसर अस्तित्वात आहे. परंतु येथे आमदार वसतिगृह तोडले गेल्याने आवश्यक आहे. राज्याचा खर्च वाढत चालला आहे. शहेनशहा मोदींचा चेहरा वाचवण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप ने बेफाम आरोप केला आहे. मनोरा दुरुस्त करता आला असता, परंतु फडणवीस सरकारच्या काळात त्यातही घोटाळा झाला. म्हणून शहेनशहाला वाचवण्यासाठी व भाजपा आमदारांना दरमहा मिळणाऱ्या पैशांसाठी आरोप करु नका”.

“कोरोनाबाबतीत किमान भाजपाकडून उपदेशाची आवश्यकता नाही. आम्ही कोरोनाच्या संकटात कार्यक्षमतेने काम करत आहोत. कोरोना हाताळण्यापेक्षा निवडणुकीत मग्न राहणाऱ्या आणि जनतेला व राज्यांना मदत करण्याऐवजी सेंट्रल व्हिस्टात स्वतःसाठी आलीशान महाल उभारणाऱ्या मोदीजींना या उपदेशाची गरज आहे. असेही त्यांनी या ट्विट मध्ये म्हणले आहे. भाजप वरती अतिशय पुराव्यांच्या आधारावर त्यांनी ही टीका केल्याचे दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.