मराठा समाजाची संघर्ष ठीणगी पडणार; लॉकडाऊन संपताच येथे होणार पहिला मोर्चा

0

मराठा समाजान आरक्षणासाठी शांततापूर्ण लढा दिला असून मराठा समाजातील सर्वच घटक या संघर्षात सहभागी झाले आहेत. तरुणाईन तर शिस्तबध्द आंदोलन करत समातबंधुत्व प्रदर्शित केल होत. परंतु दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने सादर केलेले मराठा आरक्षण रद्द केले आहे. हे आरक्षण ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडत आहे असा निर्णय न्यायालयाने दिला आहे.

दरम्यान मराठा समाज या निर्णयाने संतप्त झाला असून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समाजातर्फे ठिकठीकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. मराठा समाजान या निर्णयाविरोधात लढा देण्याचा निर्णय घेतला असून यासंदर्भात ६ मे रोजी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि पदाधिकारी तसेच शिवसंग्रांमचे नेते विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणासंदर्भात रणनिती ठरवण्यात आली असून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संपूर्ण राज्यातील मराठा समाजाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. बैठकीनंतर विनायक मेटे यांनी माहिती दिली की, १६ मेपासून मोर्चा काढण्याचे निश्चित झाले असून बीडमधून पहिला मोर्चा काढण्यात येईल.यासाठी जिल्हाधिकारी यांना रितसर निवेदन देण्यात येईल. अशीही माहिती विनायक मेटेंनी दिली. कोरोना परिस्थितीने मोर्चे तसेच आंदोलने यावर बंदी असताना मराठा समाजाचा मोर्चा कसा पार पडतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.