
आजच्या काळातला गुंतवणुकीचा सर्वात चांगला पर्याय म्हणजे, जमीन खरेदी करणे. आजच्या काळात खरेदी केलेल्या जमिनीचे भाव नंतरच्या १५-२० वर्षांमध्ये ८-१० पटीने वाढलेले असतात. त्यामुळे येणाऱ्या पिढ्यांसाठीची गुंतवणूक म्हणून जमीन खरेदी व्यवहाराकडे पहिले जाते.
पण या बाबाची गोष्टच वेगळी आहे. त्याने जमीन खरेदी केली आहे. पण ती चक्क चंद्रावर! आहे ना आश्चर्य! या व्यक्तीचे नाव आहे, विजय कथेरिया. विजय हे गुजरातचे रहिवासी असून, ते व्यावसायिक आहेत. नुकताच त्यांनी आणि त्यांच्या पत्नीने एका गोड निरागस मुलीला जन्म दिला. आणि या जगावेगळ्या बाबाने आपल्या मुलीच्या जन्माची भेट म्हणून, तिला पृथ्वीवरची नाही, तर चक्क चंद्रावरची जमीन भेट केली आहे.
हो! ही खरी गोष्ट आहे. विजय यांनी त्यांच्या ‘नित्या’ या मुलीच्या नावावर थेट चंद्रावरची जमीन विकत घेतली आहे. तिच्यासाठी चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी, न्युयोर्क स्थित ‘लुनार लैंड रजिस्ट्री’ नावाच्या कंपनीला ऑनलाईन आवेदन पत्र दिले होते.
ज्यानंतर या कंपनीने सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून, कथेरिया यांना चंद्रावर जमीन खरेदी करण्याच्या मंजुरीचा एक मेल पाठवला आणि या मेलसोबतच सर्व कायदेशीर कागदपत्रं देखील पाठवली. या सगळ्या कार्यावाहीनंतरच चंद्रावरच्या जमिनीचा एक एकर भाग हा विजय कथेरिया यांच्या मुलीच्या नावावर केला गेला.
अशाप्रकारे विजय कथेरिया हे चंद्रावर जमीन खरेदी करणारे पहिले व्यापारी ठरले आहेत, तर त्यांची मुलगी नित्या जगातली सर्वात कमी वयाची मुलगी जिच्या नावावर चंद्रावर स्वतःची जमीन आहे. ही बातमी समाज माध्यमांवर वाऱ्यासारखी पसरली. आणि बाबाने आपल्या मुलीला दिलेल्या या अनोख्या भेटीची भारतभर चर्चा होऊ लागली आहे.
लहानपणी आपल्या सगळ्यांनाच आजी-आजोबांनी, चांदोबा, चंदामामा अशी काल्पनिक नावं असलेल्या चंद्राच्या गोष्टी सांगितल्या असतील. पण इथे तर चक्क या जोडप्याने त्यांच्या गोड मुलीसाठी शेजारी म्हणून चक्क चंद्रालाच एकप्रकारे जवळ केलंय.