
बाळासाहेब ठाकरे हे अवघ्या महाराष्ट्राचं दैवत. ‘हिंदूहृदयसम्राट’ अशी नामबिरुदावली ज्यांच्या नावापुढे लावली जाते असे, एकमेव व्यक्तित्व म्हणजे बाळासाहेब ठाकरे. परंतु, महाराष्ट्राच्या या लाडक्या नेत्याचे नाव ‘बाळ’ कसे पडले? यामागे देखील एक रंजक कहाणी आहे.
बाळासाहेबांचा जन्म हा २३ जानेवारी १९२६ चा, प्रबोधनकार केशवराव ठाकरे आणि रमाबाईंना चार मुली झाल्यानंतरचा हा पहिला मुलगा. पदरी चारीही मुलीच म्हटल्यावर म्हातारपणी आपला सांभाळ कोण करणार? या काळजीने ग्रासून गेलेल्या या उभयंतांच्या संसारात म्हणूनच या मुलाचे महत्व फार होते.
एकेदिवशी प्रबोधानकारांनी गमतीत, आपल्या पत्नी रमाबाई यांना विचारले की, “काय हो, आपल्या शेतात ज्वारी बाजरीच पिकते काय? गहू पिकतच नाही!’ आणि या प्रसंगानंतर जेव्हा पुन्हा रामाबाई यांना दिवस गेले, तेव्हा त्यांच्या पोटी हा ‘हिरा’ जन्माला आला.
पुणे बाळासाहेबांची जन्मभूमी. बाळासाहेबांचा जन्म झाल्यानंतर केशवराव आणि रमाबाई या दोघांनीही हे बाळ आई जगदंबेच्या ओटीत ठेवलं आणि म्हणाले, हे बाळ तुझं. तुझ्या स्वाधीन केलंय ! म्हणून त्या बाळाचं नाव ‘बाळ’ असं ठेवलं गेलं.