मराठा आरक्षणाची राज्य सरकारने जोमाने बाजू मांडली –  छत्रपती संभाजीराजे भोसले

0

मराठा आरक्षण आज सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. या बद्दल सोशल मीडिया वर खूपच तीव्र अशा शब्दात निषेध केला जातो आहे. मराठा समाजाने मागील काळात आरक्षणासाठी मोठ्या संख्येने मुक मोर्चे काढले होते. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजाने एकत्रित येत आरक्षणाची मागणी केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मागास आयोगाचा अहवाल याच्यातून आम्हाला मराठा आरक्षण देणे गरजेचे आहे हे स्पष्ट होत नसल्याचं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. या बाबतीत छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. गरीब मराठ्यांसाठीचा हा माझा लढा होता. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागतो. मात्र हा निर्णय दुर्दैवी असल्याचे सुध्दा त्यांनी सांगितले. या सरकारने जोमाने बाजू मांडली. जे शक्य होते ते सगळे केले. राज्य सरकारने आपली बाजू चांगली मांडली, असे संभाजीराजे यावेळी बोलताना म्हणाले.

“सुप्रीम कोर्टाचा निर्णय मराठा समाजाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी आहे. पण उद्रेक होऊ नये या मताचा मी आहे. कोरोनामुळे माणसं मरत आहेत. सध्या आपली माणसं जगली पाहिजेत, याकडे लक्ष दिले पाहिजे. कोणी उद्रेक शब्दही काढू नका”, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.