
महाराष्ट्रातील कलावंताच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे – अमित देशमुख
कोरोनाच्या मुळे राज्यात सर्वत्र बंद आहे. नाटकांची थेटर बंद पडली आहेत. या वर्षी सुध्दा यात्रा झाल्या नाहीत. त्यामुळे गावा-गावात होणारे तमाशे देखिल झाले नाहीत. इतर छोट्या-मोठ्या कलाकारांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान फटका बसला आहे. हे नुकसान हे भरून न येण्यासारखे आहे. सध्या महाराष्ट्रातील कलाकार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. या दृष्टीने राज्य शासनाने सकारात्मक विचार करत आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने विचार केला आहे, असे अमित देशमुख यांनी यावेळी सांगितले.
अमित देशमुख यांनी या संबंधीत निर्णय घेऊन सांस्कृतिक कार्य विभागास प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहेत. यावेळी बोलताना देशमुख म्हणाले, “कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलावंतांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे. कलाकारांना शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येईल. त्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाने ताबडतोब प्रस्ताव सादर करावेत”, त्यांनी यावेळी सांगितले आहे.
राज्य सरकार कलावंताच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहत आहे. ही कलावंताच्या दृष्टीने लोककला आणि कला जपण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असा निर्णय आहे.