पिंपरी चिंचवडच्या भाजप नगरसेविकेच्या मुलाने डोक्यात झाडून घेतली गोळी

0

नैराश्य हा रोग सध्या समाजाच्या कोणत्याही घटकात,स्तरात दिसून येत आहे.आर्थिकविवंचनेतून,प्रेमभंगातून,मानसिक छळातून कितीही वयाची व कोणत्याही आर्थिक स्तरातील व्यक्ती नैराश्यास बळी पडतआहेत.अशाप्रकारचे आत्महत्या प्रकरण पोलिस अधिकारी, सरकारी कर्मचारी, खाजगी कर्मचारी यांच्यातही दिसून येत आहे.कौटुंबिक वादातून किंवा शेतकरी आत्महत्या प्रकरण तर सर्रास घडत असतात.

असाच एक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये रविवारी रात्री घडला असून अवघ्या 21 वर्षाच्या मुलाने स्वताच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका करूणा चिंचवडे यांचा मुलगा प्रसन्ना शेखर चिंचवडे याने वडील शेखर चिंचवडे यांची पिस्तूल घेत स्वताच्या डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. रविवारी रात्री प्रसन्नाने कुटुंबियांसमवेत जेवण केले त्यानंतर तो त्याच्या खोलीत झोपण्यासाठी म्हणून गेला त्यानंतर काही वेळातच गोळी झाडल्याचा आवाज आला.

गोळीच्या या आवाजाने घरातील सदस्यांनी त्वरित प्रसन्नाच्या खोलीकडे धाव घेतली खोलीत प्रवेश केला असता तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याच आढळून आल.त्वरित हालचाल करत त्याला उपचारासाठी थेरगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात करण्यात आले,तेथे उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.प्रसन्नाचे वडील शेखर चिंचवडे यांच्याकडे परवानाधारक पिस्तूल आहे.याच पिस्तुलाचा वापर त्याने केला आहे. आत्महत्येच कारण अजून कळलेले नाही.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.