फ्रिज साफ करण्याची एगदम साधी सोपी पद्धत.

0

फ्रिज ही वस्तू किचनमधील अविभाज्य घटक असून फळ, भाजी, सॉस, रेडी टू इट फूड तसेच थोडे शिल्लक अन्न ठेवण्यासाठी तसच ते टिकवण्यासाठी फ्रिजचा वापर सर्रास केला जातो. सर्वसाधारणपणे उन्हाळ्यात फ्रिजचा वापर वाढतो. थंड पाणी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम यांसाठी फ्रिज दिवसभर वापरला जातो. फ्रीजमध्ये बरेचदा लिकरही ठेवल जात, बियर, वाईन किंवा इतर प्रकारच लिकर फ्रीजमध्ये ठेवल जात. परिणामी फ्रिजला डाग पडणे, वास येणे अशा प्रकारच्या समस्या जाणवतात. साधारण फ्रिजमधील सामान थोड कमी झाल की, फ्रिज मोकळा करून स्वच्छ करावा. चला पाहूया फ्रिज कसा साफ करावा.

१) फ्रीज साफ करण्यापूर्वी फ्रिज बंद करून पीन काढून घ्या तसेच फ्रिजमधील उरलेल सगळ सामान काढून घ्या व फ्रिजचे शेल्फ काढून घ्यावेत. काढलेले शेल्फ नीट हाताळावे.
२) फ्रीज साफ करण्यासाठी एक घरगुती क्लीनर तयार करू शकता, त्यासाठी पाणी, खायचा सोडा, लिक्विड डिश वॉश आणि व्हिनेगर यांच मिश्रण करून वापरू शकता.
३) फ्रीज साफ करण्यापूर्वी तयार केलेल्या मिश्रणाने शेल्फ धुवून घ्या.
४) आता तयार मिश्रणात एक कापड बुडवून त्याने फ्रिजचा आतील भाग तसेच डाग पडलेली जागा पुसून घ्या.
५) आता परत एका ओल्या कापडाने फ्रीज पूर्ण पुसून घ्या. फ्रिजचे रबरही पुसून घ्या. संपूर्ण फ्रीज कोरड्या कापडाने पुसून घ्या. किमान अर्धा तास फ्रीज उघडा ठेवा व परत वापरायला चालू करा.

अशाप्रकारे फ्रिज साधारण सहा महिन्यातन एकदा साफ करा.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.