
शरद पवारांवरची दुसरी शस्त्रक्रिया यशस्वी
मुंबई : ३० मार्च रोजी शरद पवारांच्या पित्ताशयामध्ये अडकलेला मोठा खडा बाहेर काढण्यात आला होता. यानंतर 3 एप्रिल रोजी शरद पवार यांना ब्रीच कॅन्डी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.
मात्र, शरद पवारांच्या गॉल ब्लॅडरमध्ये छोटे-छोटे खडे असल्याने काही दिवसात त्यांचे गॉल ब्लॅडरही काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. मायदेव यांनी दिली होती.
मात्र गॉल ब्लॅडर जरी शस्रक्रिया करुन काढण्यात येणार असले, तरी हा अवयव काढल्यानंतर शरद पवारांचे काहीही नुकसान होणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते.
दरम्यान, पवार यांच्यावर काल ब्रीच कँडी रुग्णालयात, पित्ताशयावर होणारी शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली असून, त्यांची तब्येत स्थिर असल्याचीही बातमी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना, 30 मार्च रोजी प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी प्राथमिक तपासणीनंतर त्यांच्या पित्ताशयात खडे असल्याचं आढळलं. त्यानुसार त्यांच्यावर छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तसेच त्यांच्यावर अजून एक शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.
Update
A successful Laparoscopy surgery was conducted today on our party President Sharad Pawar Saheb's Gall Bladder by Dr. Balsara.
He is in stable health and is recuperating in his room at the Breach Candy Hospital, Mumbai— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 12, 2021