‘मिसेस श्रीलंका’ या सौंदर्यस्पर्धेच्या वेळी मंचावर झाला हंगामा.

0

श्रीलंकेमध्ये  नुकतीच  ‘मिसेस श्रीलंका’ हि सौंदर्य प्रतियोगिता स्पर्धा पार पडली.त्यामध्ये विजेतीच्या डोक्याला दुखापत झाली. ‘मिसेस श्रीलंका’ विजेतीचे नाव पुष्पिका डी सिल्व्हा असे आहे. सौंदर्यस्पर्धेचा हा कार्यक्रम श्रीलंकेची राजधानी असलेल्या कोलंबोतल्या एका थिएटरमध्ये पार पडला. या कार्यक्रमाचं टीव्हीवर थेट प्रसारण केले जात होते.

पुष्पिका डी सिल्व्हाने या सौंदर्यस्पर्धेचं विजेतेपद पटकावले खरे,  पण त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच तिच्याकडून विजेतेपदाचं मुकूट हिसकावून घेण्यात आले. सौंदर्यस्पर्धेच्या मंचावर सर्व प्रेक्षक आणि परीक्षकांसमोर हा प्रकार घडला. २०१९ मध्ये मिसेस श्रीलंकेचं विजेतेपद पटकावणाऱ्या कॅरोलिन ज्युरीने पुष्पिकाच्या डोक्यावरून मुकूट हिसकावून दुसऱ्या नंबरच्या विजेतीला दिला. एका युट्यूबरने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि तो क्षणार्धात व्हायरल झाला.

पुष्पिकाला विजेती घोषित केल्यानंतर कॅरोलिनने आधी तिच्या डोक्यावर मुकूट ठेवला, त्यानंतर काही वेळाने कॅरोलिन मंचावर पुन्हा एकदा आली आणि पुष्पिकाला अपात्र ठरवत तिच्या डोक्यावरून मुकूट हिसकावून दुसऱ्या नंबरच्या विजेतीला दिल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळतंय. पुष्पिका ही घटस्फोटीत असल्याने अपात्र ठरते, कारण मिसेस श्रीलंका ही स्पर्धा फक्त विवाहित महिलांसाठी असल्याचं कॅरोलिन म्हणते. “तुम्ही विवाहित असायला हवं, घटस्फोटीत नाही असा या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे मी याविरोधात पहिलं पाऊल उचलतेय आणि विजेतेपदाचं मुकूट उपविजेतीला सुपूर्द करते”, असं कॅरोलिन म्हणाली.

हा सगळा प्रकार पुष्पिकाला असहाय्य झाला आणि कॅरोलिनने जेव्ह्हा तिच्या डोक्यावरून मुकुट हिसकावून घेते वेळी तिच्या डोक्याला दुखापत देखील झाली होती.त्यानंतर पुष्पिकाने स्पर्धेचा कोणताही नियम मोडला नसून तिचा घटस्फोट झालेला नाही,ती फक्त नवऱ्यापासून वेगळे राहते, आणि आपल्या मुलांचा सांभाळ करते अशा सत्य घटना पुढे आल्या. या घटनेनंतर स्पर्धेच्या आयोजकांनी पुष्पिकाची माफी मागितली.

पुष्पिकाने नंतर फेसबुकवर पोस्ट लिहित तिची बाजू मांडली. “केवळ श्रीलंका नाही तर जगभरातील सौंदर्यस्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वांत अपमानास्पद घटना आहे. पण या घटनेने खचून जाणार नाही. मी घटस्फोटीत महिला नाही. जर मी घटस्फोटीत असेन तर त्यांनी तशी कागदपत्रं सादर करावीत”, असं पुष्पिकाने लिहिले. पुष्पिका डी सिल्व्हा या सिंगल मदरचा आदर्श आज अनेक महिलांनी घेणे आवश्यक आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.