
पीक वाचविण्यासाठी शेतकरी वाटेल ते प्रयत्न करायला तयार असतो यासाठी नाना युक्त्या, प्रयत्न शेतकरी करत असतो. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील रोहिणी भोईटी या गावातील तरुणाने चांगला पाऊस झाल्यानंतर शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती. मात्र लागवड केल्यानंतर पावसाने दडी मारली. शेतातलं पीक जळून गेलं असतं यावरती उपाय म्हणून या तरुणाने अनोखी शक्कल लढवलीय.
या तरुणाचे नाव आहे विणेश याने आपल्या शेतामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये कापूस लावला होता. मात्र वेळेवर पाऊस न झाल्यामुळे याला नेमका काय उपाय म्हणून एक अनोखी शक्कल लढवत या तरुणाने पाणी देण्याची व्यवस्था केली. आपलं पीक जळू नये म्हणून या तरुणाने प्रत्येक बी लागवड केलेल्या ठिकाणी एकेक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पाणी भरून त्याला छोट छिद्र करत ठिबक सिंचन सारखे सिंचन प्रत्येक रोपा जवळ केले. यामुळे प्रत्येक रोपाच्या जवळ पाणी मिळाल्यामुळे उगवणक्षमता चांगली झाली व जी रोपे अंकुरलेली उरलेली होती ती चांगल्या प्रकारे आली आहेत.
या अनोख्या प्रयोगामुळे दुबार पेरणीचे संकट टळले आहे; संपूर्ण परिसरामध्ये या तरुणाचे कौतुक होत आहे.