पंतप्रधान मोदींचा बचाव करायला गेले अन् संबीत पात्रा पडले उघडे…

0

देशातील परिस्थितीचे अपयश रोखण्यासाठी भाजप इतर विषयांवर बोलताना दिसून येत आहे. सत्य परिस्थिती कोणी जर मांडली; तर त्याला कसे अडचणीत आणता येईल असा प्रयत्न केला जातो आहे. ठोस अशी भूमिका देशातील केंद्र सरकार घेताना दिसत नाही. जगभरातून भारतातील परिस्थिती वरती टीका केली जात आहे. अशा काळात भाजप नेते माणसं वाचवण्याचे प्रयत्न सोडून राजकारण करत आहेत.

शिवसेनेच्या मुखपत्रातून “नेहरू गांधी यांच्यामुळे कोरोना लढाईत भारत तग धरून आहे” असे सामना वृत्तपत्रातील अग्रलेखात म्हटले होते. त्याचा संदर्भ देऊन संबित पात्रा यांनी महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. सोशल मीडियावर मात्र ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहेत. भाजपच्या अपयश आवरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सामनामधील अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. नेहरू-गांधीतसेच इंदिरा गांधी राजीव गांधी नरसिंहराव मनमोहन सिंग यांनी उभा केलेल्या योजना प्रकल्प याच्या जोरावर आपण खंबीरपणे उभा आहोत. अशा आशयाच्या लेखावर प्रतिक्रिया देताना पात्रा यांनी ‘हे चुकून छापलं आहे का? ते खरंच असं म्हणालेत?’ असं खोचक ट्विट केलं आहे.

संबित पात्रा यांना ट्विटर वरती अनेकांनी ट्रोल केली आहे. तसेच त्यांच्या मदतीसाठी भाजपची आयटी सेल धावून आल्याचे दिसते. गौरव जैन यांनी पात्रा यांची खिल्ली उडवली आहे. ‘मोदी यांनी देशाला एवढं उंचीवर नेलंय की आता अॉक्सीजन कमी पडू लागलायं’ असं ट्विट जैन यांनी केलं आहे. ‘भारत नेहरू-गांधींमुळे तग धरून आहे की नाही, माहीत नाही, पण भारत मोदी-शहांमुळे मरतोय हे नक्की’ असं ट्विट नायक हसन यांनी केलं आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.