दिड महिन्यापूर्वी शरद पवारांनी केलेलं भाकीत खरे ठरले!

0

खा.शरद पवारांच्या राजकीय ज्ञानाच्या बाबतीत कायम चर्चा होताना दिसून येतात. गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत अदृश्य शक्ती वावरते म्हणून शरद पवारांच्या राजकीय कौशल्याला बोलले जाते. त्यांचे राजकारणाच्या बाबतीत जे ज्ञान आहे ते अफलातून आहे. त्यांना नेमकं वारे कसे आहे हे ओळखायला अजिबात वेळ लागत नाही. त्यांना देशातील कल फारच लवकर लक्षात येतो. असेच त्यांचे एक केलेलं राजकीय भाकीत चांगलेच व्हायरल होताना दिसत आहे. या संदर्भात व्हिडिओ टाकून राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या पेज वरून पोस्ट करण्यात आले आहे.

पोस्ट मध्ये असा उल्लेख आहे की” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शरद पवार यांनी दि. १४ मार्च २०२१ रोजी बारामती येथे पत्रकारांशी संवाद साधताना पाच राज्यांच्या निवडणुकांबाबत भाकीत वर्तविले होते. आज ते भाकीत बहुतांश खरे ठरल्याचे दिसून येत आहे. आसाम आणि पुद्दुचेरी येथे भाजप पक्ष सत्ता स्थापनेच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यात भाजपचा मोठा पराभव होत आहे. या तीनही राज्यात भाजपने मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र तरीही तिथली जनता भाजपला नाकारेल हा मा. पवार साहेबांनी वर्तविलेला अंदाज खरा ठरला”.

श्री. शरद पवार म्हणाले होते की आसाम वगळता भाजप चा पराभव होईल. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यात भाजप ला अपयश आल्याचे दिसून येत आहे. या बाबतीत शरद पवार यांनी भाकीत केले होते ते या निवडणूक निकालातून सत्य झाल्याचे दिसून येत आहे.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.