‘जय भवानी जय शिवाजी’ नवीन मालिका लवकरच येत आहे प्रेक्षकांच्या भेटीला.

0

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. अशाच शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा सांगण्यासाठी लवकरच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘जय भवानी जय शिवाजी’ हि नवीन मालिका २ मे पासून रात्री १० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नेताजी पालकर, बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशिद, जीवा महाला, तान्हाजी मालुसरे, कान्होजी जेधे, हंबीरराव मोहिते, कोंढाजी फर्जंद या शूरवीरांची नावं आपल्याला परिचित आहेत. याच शूर मावळ्यांची आणि त्यांच्या साथीदारांची शौर्यगाथा या मालिकेत सांगितली जाणार आहे. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही मालिका अशा लवढय्यांच्या शौर्याला अर्पण असेल.

सुप्रसिद्ध अभिनेता भुषण प्रधान या मालिकेत छत्रपती शिवजी महाराज यांची भूमिका साकारणार आहे. शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल बोलताना भूषण म्हणतो की, ‘छत्रपती शिवाजी महाराज साकारणं हे प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं. माझं देखिल स्वप्न पूर्ण होत आहे. मी बऱ्याच वर्षांपासून वाट पहात होतो की आपल्याला कधी महाराजांची भूमिका साकारायला मिळेल. जबाबदारीचं भान नक्कीच आहे. त्यामुळे उत्सुकता आणि धाकधुक दोन्ही वाढली आहे. ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी माझ्यासोबतच संपूर्ण टीम मेहनत घेते आहे. लूकपासून सेटपर्यंत सगळं काटेकोरपणे पाहिलं जातंय. आमचे वर्कशॉप्स घेतले जात आहेत.’

या मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड महाराष्ट्राचच नव्हे तर आपल्या देशाचं आराध्य दैवत. आत्तापर्यंत महाराजांवर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, मालिका आणि चित्रपट निर्माण झाले आहेत.या महान राजाच्या सेवेत अनेक रत्न होती ज्यांनी महाराजांच्या शब्दासाठी आपल्या देव देश आणि धर्मापायी प्राणांची आहुती दिली. अश्या शिलेदारांची गोष्ट सांगणारी मालिका जय भवानी जय शिवाजी सादर करताना अभिमान वाटतो आहे. स्वराज्यासाठी लढलेल्या प्रत्येकालाच या मालिकेच्या निमित्ताने मानाचा मुजरा.’

भूषण प्रधान याचा विविध भूमिकेतील अभिनय हा प्रेक्षकांच्या सतत आवडीतील विषय राहिला आहे. आता ‘जय भवानी जय शिवाजी’ या मालिकेतील शिवाजी महाराजांची भूमिका भूषण कशा पद्धतीने पार पाडतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.