
सिमला मिरची मागवून व्यापाऱ्याने गंडवलं, जयंत पाटलांनी सांगितला धमाल किस्सा!
टप्प्यात कार्यक्रम करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चांगलेच माहीर आहेत. त्यांची हुशारी, त्यांचा असणारा अभ्यास आणि व्यासंग सर्वश्रुत आहे. मात्र जयंत पाटील यांना पण एकदा बाजारात फसवले गेले होते.
एका उद्घाटन प्रसंगी जयंत पाटील यांनी भाषणात हा किस्सा सांगितला होता. “मी १९९२ ते १९९३ या काळात मी शेती केली होती. त्यावेळी मी लाल, हिरवी, पिवळी सिमला मिरचीचे उत्पादन घेतले होते. सुरुवातीला मला २ ते ३ महिने चांगले पैसे मिळाले. आपण चांगली शेती करु, असे मला वाटले होते. पण नंतर व्यापाऱ्याने माल खराब आहे,… असे बरेच काही सांगितले. त्यामुळे तो व्यापारी कमी पैसे देऊ लागला. यामुळे मी त्या वेळी २ ते ३ लाखांना फसलो,” असे जयंत पाटील म्हणाले.
शेती म्हणले की तोटा आलाच मात्र याच बरोबर व्यापाऱ्यांची असणारी फसवणुकीची वृत्ती सुद्धा मोठी आहे. व्यापाऱ्यांकडून गोड बोलून पद्धतशीर कार्यक्रम कित्येक शेतकऱ्यांचे झाले आहेत. कित्येक वेळी तर बिल सुद्धा मिळत नाहीत. तर काही वेळा गाडीचे भाडे खिशातून द्यावं लागतं; भावाच्या चढ उतार यावर हे गणित बर्या पैकी अवलंबून असते!