मुख्यमंत्र्यांच्या प्रसंगावधानामुळे वाचले दोन अपघातग्रस्त तरुणांचे प्राण; मदतीला पाठवल्या स्वतः च्या ताफ्यातील दोन गाड्या!

0

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फारच संवेदनशील स्वभावाचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्यांचा असणारा कुटुंबवत्सल स्वभाव तसेच सातत्यानं राज्याचा प्रमुख हा कुटुंब प्रमुख असल्या च्या भूमिकेत वावरताना दिसून येतो. सातत्याने राज्यातील जनतेच्या प्रति आपुलकीची भावना त्यांच्या कार्यातून दिसून येते.

आषाढी एकादशी नंतर परंपरेप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भर पावसामध्ये स्वतः गाडी चालवत सोमवारी रात्री पंढरपूर मध्ये दाखल झाले. या प्रवासाच्या दरम्यान एक अपघात झाल्याचे दिसले तात्काळ मुख्यमंत्र्यांनी प्रसंगावधान दाखवत अपघातग्रस्त दोन दुचाकीस्वारांना मदत मिळवून दिली. स्वतःच्या ताफ्यातील गाड्या पाठवत मदत केली. तात्काळ मिळालेल्या मदतीमुळे अपघातग्रस्त दुचाकीस्वरांना जीवनदान मिळालं आहे.

मुख्यमंत्र्यांचा ताफा पंढरपूरच्या पंचक्रोषीमध्ये असणाऱ्या करंबक गावाजवळ आला असता येथे दोन बाईकस्वारांचा भीषण अपघात झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यांनी तातडीने आपल्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांची एक गाडी आणि रुगणवाहिका या तरुणांच्या मदतीसाठी पाठवली. या सुरक्षा रक्षकांनी केलेल्या मदतीमुळे आणि रुगणवाहिकेमुळे अपघातग्रस्त तरुणांना वेळीच उपचार मिळाले आणि त्यांचे प्राण वाचले. केवळ मदत न पाठवता पंढरपूरमध्ये पोहचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: या तरुणांच्या प्रकृतीची चौकशी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माणुसकीची अनोखे दर्शन सर्वांनाच या वेळी घडून आले.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.