स्वर्गीय गोपिनाथ मुंडेंनी पंजाबी मित्राच्या समिपतेने ठेवलय खासदार प्रितम यांच नाव

0

भाजपचे नेते गोपिनाथ मुंडे यांच्या मैत्रीचे किस्से आजही सांगितले जातात.राज्यातील सर्वच पक्षात त्यांचे मित्र होते.काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री विलासराव दैशमुख यांच्याबरोबर तर गोपिनाथ मुंडे विद्यार्थी दशेपासून मैत्रीत होते.असाच एक रंजक किस्सा गोपिनाथ मुंडे यांची कन्या आणि विद्यमान खासदार प्रितम ताई मुंडे यांच्या नावाचा आहे.

गोपिनाथ मुंडे यांचे कुलवंंतसिंह कोहली नावाचे मुंबईतील हॉटेल व्यावसायिक मित्र होते.त्यांच्या हॉटेलातच अनेकदा गोपिनाथ मुंडे जेवायला जात असत.बरेचदा भाजपच्या गोपनिय बैठका तिथेच पार पडत असत.गोपिनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची कुलवंतसिंह कोहली यांच्याबरोबर मैत्री जमली.इतकच काय कुलवंतसिंहांनी एकदा स्वताला बहीण नसल्याची खंत व्यक्त केली.त्यावर प्रमोद महाजन यांनी त्यांची बहीण प्रज्ञा महाजन यांना कुलवंत सिंहांना राखी बांधण्यास सांगितली आणि कुलवंतसिंह प्रज्ञाताईंचे भाऊ झाले.बरीच वर्ष त्या कुल़ंतसिंहांना राखी बांधत होत्या.पुढे प्रज्ञा आणि गोपिनाथ मुंडे यांचा विवाह झाला.पंकजा मुंडे यांचा जन्म झाला.

१९८२ साली प्रज्ञा मुंडे पुन्हा गरोदर होत्या त्यावेळी मुंडे दांम्पत्य कुलवंतसिंह यांच्याकडे गेले असताना प्रज्ञाताईंना थोडी धाप लागली व तहान लागली.यावर कुलवंतसिंहांनी विचारल,”सब ठीक है ना.” यावर नेहमीच्या शैलीत हसत”गोपिनाथराव म्हणाले,ये प्रितम आपके हवाले कर रहा हूँ ,कुलवंतजी इसबार बेटी हो या बेटा मैं उसका नाम प्रितमही रखूंगा।”काही दिवसातच प्रज्ञाताईंनी गोंडस बाळाला जन्म दिला व गोपिनाथरावांनी तिच नाव प्रितम ठेवल.

कुलवंतसिंह कोहली यांनी प्रितम मुंडे यांच्या लग्नात मामाची भूमिका निभावत सर्व विधी पार पाडले होते.प्रमोद महाजन यांचा प्रितम यांच्या लग्नाआधीच मृत्यू झाला होता.

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.